नगर हादरलं ..’ आई झोपलेली आहे तिला जाऊन बघ ‘, असे मुलीला सांगून आरोपी फरार

शेअर करा

कामानिमित्त परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड आणि तीक्ष्ण हत्याराने वार करत तिचा खून केला. ही धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे या गावी घडली असून 12 तारखेला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी बाली बाळू निकम ( वय 22 ) वांबोरी दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मयत झालेली पत्नी अलका वसंत शिंदे ( वय 45 ) हिने पती वसंत लक्ष्मण शिंदे ( राहणार गुंजाळे तालुका राहुरी ) याच्याकडे मुलाला भेटण्यासाठी बांगर्डे श्रीगोंदा इथे जाण्याचा आग्रह धरला होता परंतु वसंत याने अलका हिला मुलाकडे जाण्यास विरोध केला .त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले आणि रागाच्या भरात वसंत शिंदे याने पत्नी अलका शिंदे हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार केले. त्यामुळे अलका हिचा जागेवरच मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळी सात वाजता वसंत मुलीकडे गेला आणि तुझी आई झोपलेली आहे तिला जाऊन बघ, असे त्याने मुलीला सांगितले आणि तो तिथून पळून गेला. मुलगी आईकडे गेल्यानंतर आई मयत झाल्याचे पाहून तिला मोठा धक्का बसला आणि तिने तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क करून घटनेची माहिती दिली श्रीरामपूरचे विभागीय उपाधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस उपनिरीक्षक संजय शंकरसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली आणि लपून बसलेल्या आरोपीचा स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले.


शेअर करा