…म्हणून चक्क सेलिब्रिटीजने ‘ त्यांना ‘ भीत भीत दिले पैसे मात्र त्यानंतर..

शेअर करा

पैसे कमावण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम राहिलेला नाही . मुंबई पोलिसांनी नुकत्याच अशा एका एक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश केलेला असून त्यात चक्क सामान्य माणसापासून बॉलिवूडचे जवळपास 100 सेलिब्रिटीज अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांनी सेक्सटॉर्शन प्रकरणात नागपूर, ओदिशा, गुजरात, कोलकाता येथून चार आरोपींना अटक केली आहे . धक्कादायक बाब म्हणजे यातील दोन आरोपी हे अभियंते आहेत तर एक आरोपी अल्पवयीन आहे .

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या ते गेल्या अनेक दिवसापासून रडारवर होते. वेगवेगळ्या राज्यांतील 258 जणांना त्यांनी बळीचा बकरा बनवले आहे .पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, 12 बनावट खाती, 6 बनावट ईमेल आयडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 258 जणांची फसवणूक केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे .

या टोळीच्या शिकार ठरलेल्या व्यक्त्तींमध्ये बॉलिवूडमध्ये A श्रेणीमध्ये येणारे सुमारे 100 जण आहेत. याशिवाय टीव्ही इंडस्ट्रीशी निगडीत असलेले अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील या सेक्स्टॉरेशन रॅकेटचे बळी ठरले आहेत. सेलिब्रिटींच्या तसल्या व्हिडीओच्या बदल्यात हे रॅकेट लाखो रुपये उकळत होते. पैसे न दिल्यास ट्विटर, डार्कनेट आणि टेलिग्राम यासारख्या सोशल मीडिया अॅप्लिकेशनवर इतर लोकांना मोठ्या पैशांना हे कन्टेन्ट विकले जात होते.

काय होती कामाची पद्धत ?

सेक्स्टॉरेशनमध्ये एखाद्या व्यक्तीशी सोशल मीडियाद्वारे (स्नॅपचॅट, इंस्टाग्राम किंवा टिंडर ) पहिल्यांदा मैत्री केली जाते. एकदा मैत्री झाली की मग ६ महिन्यापर्यंत त्याला खेळवत खेळवत ती व्यक्ती प्रेमाच्या जाळ्यात अडकवली जाते. मग एखाद्या दिवशी वेळ साधून व्हिडिओ कॉलवर त्या व्यक्तीला नग्न होण्यास सांगितले जाते. त्याचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो. एकदा व्हिडीओ ताब्यात आला कि मग त्याला व्हिडीओ अपलोड न करण्याच्या अटीवर सेलिब्रिटी किंवा त्या व्यक्तीकडून हवी तितकी रक्कम उकळली जाते.

तपास सुरु असताना असले सर्व व्यवहार हे नेपाळ येथील बँकांच्या अकाऊंटचा आधार घेत केले जात असल्याचे लक्षात येताच सायबर सेलने आता नेपाळ प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि बँक खात्याशी संबंधित तपशील मागितला आहे जेणेकरून या प्रकरणाच्या मुळाशी पोहचून आरोपींना त्यात कठोरात कठोर असे शासन होऊ शकेल.


शेअर करा