आरएसएस प्रणित ‘ ह्या ‘ संघटनेचे केंद्राच्या विरोधात ८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन

शेअर करा

केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांना देशात मोठ्या प्रमाणात विरोध होत असून केंद्राला याची कुठलीच जाणीव नसल्याचे चित्र आहे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाने देखील परत एकदा आक्रमक होत केंद्र शासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही पिकांना किमान आधारभूत किंमत लागू करून केंद्रसरकार जबाबदारी टाळू शकत नाही, आधारभूत किंमत ही शेतकर्‍यांच्या डोळ्यात केली धूळफेक आहे, असा आरोप लावत किसान संघाने रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. आठ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे

शेतकऱ्यांना उत्पादन मूल्य मिळत नसल्याने त्यांची गरीबी वाढत असून कर्जाचा बोजा देखील वाढतो आहे. क्षणिक मदतीतून शेतकरी संकटातून बाहेर निघू शकणार नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर लाभ मिळाला पाहिजे. उत्पादन मूल्यावर सरकारचे नियंत्रण राहणे म्हणजे शेतकऱ्यांचे आयुष्य देशोधडीला लावण्याचा प्रकार आहे, असेही किसान संघाने म्हटले आहे. याबाबत व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर केंद्राच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय झाला.

शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी कठोर कायदा बनविण्याची गरज आहे. लाभदायक किमतीचा सरकारने कायदा करावा अन्यथा भारतीय किसान संघ खाजगी विधेयकाच्या माध्यमातून संसदेत कायदा बनविण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी म्हटले आहे

काय आहेत किसान संघाच्या प्रमुख मागण्या

  • शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत नको तर उत्पादनाच्या आधारावर लाभदायक किंमत मिळावी
  • एकदा मूल्य घोषित झाल्यानंतर महागाईनुसार वास्तविक किंमत देण्यात यावी
  • घोषित किमतीवरून कमी दरामध्ये विक्री झाली तर त्याला गुन्हा मानण्यात यावा
  • आठ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करण्यात येईल तर एमएसपी देखील धूळफेक आहे

शेअर करा