‘ आत्ताच्या आता नाहीतर..’ विहिरीच्या काठावर उभे राहून तरुणाला व्हाट्सऍपवर फोटो पाठवले आणि ..

शेअर करा

नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या हनी ट्रॅप प्रकाराने एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता नगर चौफ़ेरने याआधीच वर्तवली होती मात्र अखेर दुर्दैवाने नगर जिल्ह्यात हनी ट्रॅपची शिकार झालेल्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून परिसरात घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे .अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के (वय 24 ) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे . एक प्रेयसी आणि तिची आई यांच्या जाचाला वैतागून त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे .

काय आहे प्रकार ?

सुमित शिर्के (वय 24 ) या तरुणाला संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील एका मुलीने आपल्या प्रेमाच्या अडकवले. सदर प्रकाराला त्या मुलीच्या आईचीही फूस असल्याची चर्चा आहे त्यामुळे मुलीच्या आईने आपल्या मुलीला व सुमित शिर्के यांस समज दिली नाही उलट आपल्या हाती कमावणारा बकरा आलाय अशा थाटात त्यांनी त्याच्याकडून पैसे उकळवायला सुरुवात केली. तू पैसे दिले नाहीतर तुझ्या घरी येऊन राडा करेल अन् तुला कायमचे आत बसवेल,अशी धमकी तिने त्याला द्यायला सुरुवात केली त्यामुळे घाबरलेल्या सुमितने आपल्याकडे येतील त्या पद्धतीने मुलीच्या आईस पैसे देण्यास सुरुवात केली.

कोरोना काळात जसे सगळ्याचे रोजगार गेले त्यात सुमितचा देखील रोजगार आला आणि त्याच्याकडे पैसे राहिले नाहीत मात्र तरीदेखील सदर तरुणी आणि तिच्या आईकडून वसुलीसाठी त्रास देणे सुरु होते . त्यांच्या या ब्लॅकमेलिंगला वैतागून सुमितने आपल्या मोठ्या भावाकडून अन् आईकडून वेगवेगळी कारणे सांगत पैसे घेतले आणि मुलीच्या आईला पोहोच केले. सततच्या फुकटच्या पैशाला चटावलेली तरुणी आणि तिची आई यांचे आणि सुमितचे खटके उडायला लागले. ‘ मला तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही ‘, असे सांगून सुमितने तिला व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ब्लॉक करून टाकले.

काम न करता आयत्या पैशाला सोकावलेली तरुणी मात्र सुमितला सोडण्यास काही तयार नव्हती. तिने त्यानंतर सुमित यांच्या घरच्या व्यक्तींना फोन करून त्रास देणे सुरु केले. सदर मुलीने आणि तिच्या आईने आपल्या पूर्ण कुटुंबाला जेरीस आणले असल्याचे त्याच्या लक्षात आले मात्र त्याला कोणता पर्याय दिसत नव्हता. मुलीच्या आईकडून कायमच होणारी पैशाची मागणी यामुळे सुमित आपल्या जीवाला कंटाळला होता. हजार दोन हजार रुपये त्याने दिलेही होते मात्र त्यांच्या अपेक्षा देखील वाढू लागल्या.

सोमवारी ९ तारखेला सुमित आपल्या घरात बसला असता त्यास मुलीच्या आईचा फोन आला आणि ‘ मला तू दुपारपर्यंत 50 हजार रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या घरी येऊन मी आज राडाच करते आणि तुझ्यावर पोलीस ठाण्यात जाऊन कम्प्लेट करते , ‘ अशी धमकी तिने दिली. त्यामुळे सुमित हा त्या दिवशी खूपच नैराश्यात होता. मुलीच्या आईला 50 हजार रुपये देण्याची आपली परिस्थिती नसून दरवेळी भाऊ व आईकडून पैसे कसे मागायचे ? या विचाराने त्याला आणखी नैराश्यात नेले .

तो असा नैराश्यात असताना मुलीच्या आईसोबत मुलीने देखील त्यास फोन करून 50 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. मला तू जर 50 हजार रुपये पाठवून दिले नाही तर मी घरा शेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करणार आहे, असा इशारा तिने सुमित याला दिला. त्यानंतर काही वेळातच तिने आपल्या घराशेजारील विहिरीचे फोटो सुमितच्या मोबाईलवर पाठविले अखेर हतबल झालेल्या सुमितने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला व घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मयत झालेल्या सुमितच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता संबंधित मुलीच्या आईचे आलेले फोन तसेच त्या मुलीने त्याच्यासोबत व्हाट्सअपवर केलेली चॅटिंग मिळून आली आहे. त्यामुळे मयत सुमित शिर्के याच्या मृत्यूला प्रेमिका व तिची आईच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणांना भुलवून आत्महत्येची वेळ आणणाऱ्या या संगमनेर येथील महिलांवर लवकरच अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.


शेअर करा