देशात बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमध्ये एका दलित विद्यार्थिनीच्या हत्येचं प्रकरण चांगलच चर्चेत आले असून सदर प्रकरणामधील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मात्र त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावरुन केली जात आहे. अनेक महिला संघटनांनीही या घटनेचा निषेध केला असतानाच एका तमिळ अभिनेत्रीने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रेखा बोज या अभिनेत्रीने आपला संताप फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. रेखाने या प्रकरणामध्ये आपला संताप व्यक्त करताना, रडणाऱ्या मुलीचा एक फोटो पोस्ट केलाय. मात्र या फोटो सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने धक्कादायक वक्तव्य केलं असून तिच्या या कॅप्शनने मात्र भल्याभल्यांची झोप उडवली आहे .सध्या सोशल मीडियात तिने केलेल्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.
रेखा बोज हिने संबंधित प्रकरणातील आरोपीची हत्या करण्यात यावी असं म्हटल आहे मात्र इतक्यावरच न थांबता त्याची हत्या करणाऱ्या व्यक्तीसोबत मी झोपेन (शय्या करेन) असंही रेखाने म्हटलं आहे. तिने पोस्ट तेलुगूमध्ये लिहिली असली तरी अनेकजण त्याचं भाषांतर करुन तिचं म्हणणं नेमकं काय ते समजून घेत आहेत. या भाषांतरामध्येही तिने I Will Sleep With The One Who Cut Him असं या अभिनेत्रीने आरोपीबद्दलचा संताप व्यक्त करताना म्हटल्याचं दिसत आहे.
“जो कोणी त्याची (आरोपीची) हत्या करेल त्याच्यासोबत मी झोपेन,” या वाक्याने तिने पोस्टची सुरुवात केलीय. मात्र लगेच पुढे तिने, “मला माफ करा मी तो व्हिडीओ पाहिल्यानंतर काय बोलत होते मला समजलं नाही. आपण आज किती हतबल झालो आहोत,” असंही म्हटलं आहे. तसेच या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिच्या आत्म्याला शांती मिळो, असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण ?
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यामधील इंजिनीयरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका दलित विद्यार्थिनीची भररस्त्यामध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तिसऱ्या वर्षाला शिकणारी ही विद्यार्थीने घरी परत जात असताना तिच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. ती घरी जात असताना एक बाईकस्वार तिच्या जवळ आला आणि तिला बाईकवर बसण्यास सांगू लागला. मात्र तिने नकार दिला असता त्याने बाईकवरुन उतरुन तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या तरुणाला अटक करण्यात आली आहे . त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी सध्या सोशल मीडियात जोर पकडते आहे.