निवृत्त सैनिकाच डोकं फिरलं अन त्यानंतर स्वतःच्या सुनेची..

शेअर करा

आपल्या सूनेचे भाडेकरुसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून घरमालकाने सूनेसोबतच भाडेकरुचे पूर्ण कुटुंब संपवले आहे. आरोपीने धारधार शस्त्राने एकूण 5 जणांची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःहून पोलिसात हजर झाला. ही धक्कादायक घटना गुरुग्राम इथे उघडकीस आली असून आरोपी निवृत्त सैनिक असल्याचे समजते. गुरुग्राम जिल्ह्यातील राजेंद्र पार्क भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण ?

गुरुग्राम जिल्ह्यातील राजेंद्र पार्क येथे आरोपीच्या मालकीचे घर आहे. या घरात त्याची सून, मुलगा असे कुटुंब राहत होते. तसेच त्याच्या घरात त्याने आणखी एका भाडेकरूला देखील ठेवले होते. याच भाडेकरूचे आपल्या सूनेचे अनैतिक संबंध अल्याचा संशय घरमालकाला आला आणि त्याने रागाच्या भरात 5 जणांची त्याने हत्या केली. हत्या केलेल्यांमध्ये आरोपीची सून, भाडेकरू, भाडेकरूची पत्नी आणि भाडेकरुची दोन लहान मुलं यांचा देखील समावेश आहे. सर्वांची हत्या केल्यानंतर आरोपी थेट पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि या पाचही हत्या स्वतः केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे मात्र खरोखर त्या सुनेचे आणि भाडेकरूचे अनैतिक संबंध होते का ? याची माहिती समोर आलेली नाही .मिळालेल्या माहितीनुसार पाच जणांची हत्या केलेला आरोपी हा निवृत्त सैनिक आहे. पोलिसांनी मृत पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर आणखी काही गोष्टी स्पष्ट होतील, असं पोलिसांनी सांगितले आहे .


शेअर करा