पुणे हादरले..प्रेयसी विवाहित प्रियकराला सातत्याने ‘ तसला ‘ आग्रह करायची मात्र ..

शेअर करा

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून जास्त वाढले आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. आरोपीनं प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे पिशवीत भरुन लवासा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले . घटनेच्या 12 दिवसानंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून मृत महिलेच्या प्रियकराला अटक केली असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हा युवक राहत होता.

उपलब्ध माहितीनुसार, रोझिना रियाझ पानसरे ऊर्फ कविता चौधरी असं हत्या करण्यात आलेल्या 31 वर्षीय तरुणीचं नाव असून ती पुण्यातील बुधवार पेठ परिसरात वास्तव्याला होती तर हनुमंत शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे. संबंधित आरोपी हा विवाहित असून आपल्या कुटुंबीयांसोबत बुधवार पेठ परिसरात राहतो. मोबाइल दुरुस्ती करण्याचा त्याचा व्यवसाय होता.

काय आहे प्रकरण ?

आरोपी हनुमंत यानं मृत रोझिना यांना राहण्यासाठी काही दिवसापूर्वी एक भाड्यानं खोली मिळवून दिली अन यातूनच दोघांत पहिल्यांदा ओळख झाली होती. काही दिवसात दोघांत प्रेम संबंध देखील प्रस्थापित झाले.आरोपी हनुमंत अधुनमधून रोझिनाच्या खोलीवर जात असायचा आणि दिवसेंदिवस तिथेच थांबत होता मात्र विवाहित असल्याने रात्र झाली कि तो त्याच्या घरी जात असे, ही बाब रोझिना हिला सहन होत नव्हती आणि त्यातून त्यांचे खटके उडायला सुरु झाले. तू कायमस्वरूपी रात्री इकडे का राहत नाही ? यावरून ती वाद घालत होती. पुढे पुढे रात्री सोबतच झोपण्याचा आग्रह धरत रोझिना हिने हनुमंतला शिवीगाळ करायला सुरु केले.

बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होतेच मात्र 12 ऑगस्ट रोजी पुन्हा रोझिना हनुमंत याला त्याच्या घरी झोपायला जाण्यावरून हरकत घ्यायला लागली आणि रोझिना हिने हनुमंतला शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या भांडणात हनुमंतनं रोझिनाचा गळा आवळून तिची हत्या केली. ती मयत झाल्याचे लक्षात येताच तो घराला कुलूप लावून अक्कलकोटला निघून गेला. दरम्यान दोन दिवसात त्याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावता येईल ? याचा प्लॅन आखला.

14 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या मित्राचा चारचाकी टेम्पो घेऊन तो रोझिनाच्या त्या खोलीवर गेला. तिथं गेल्यावर आरोपीनं रोझिनाच्या मृतदेहाचे तुकडे केले. सर्व तुकडे ताडपत्रीच्या पिशवीत भरून हे तुकडे भूगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आता कोणी आपले काही करू शकणार नाही अशा भ्रमात तो होता मात्र दुसरीकडे 10-12 दिवसांपासून रोझिना बेपत्ता असल्याची तक्रार फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून रोझिना हीचा शोध घेत होते.

तपास सुरु असतानाच हनुमंतचे रोझिनासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हनुमंतला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केला असता हनुमंतनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा