नुकतेच कोरोनामुक्त झालेले जितेंद्र आव्हाड हे सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय झाले असून भाजपच्या कालच्या फसलेल्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनावरुन त्यांनी भाजपाला चांगलाच चिमटा काढला आहे . राज्यभरात अनेक ठिकाणी फलक, काळे झेंडे फडकवत, काळ्या फिती लावत भाजपानं सरकारचा निषेध करीत नुकतीच निदर्शनं केली होती, त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आंदोलनातून भाजपानं दुहीची बीजं पेरली, जनता माफ करणार नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे .
“संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची आहे. असं असताना महाराष्ट्रद्रोही भाजपानं आंदोलन करून दुहीची बीजं पेरली. जनता हे कधी विसरणार नाही आणि माफही करणार नाही,” असं म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहे तसेच #महाराष्ट्रद्रोहीBJP आणि #सत्तेचा_हव्यास हा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे .
संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्या साठी एकी महत्वाची असताना #महाराष्ट्रद्रोहीBJP ने आंदोलन करून दुही ची बीजे पेरली जनता हे विसरणार नाही आणि माफ ही करणार नाही#सत्तेचा_हव्यास
केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकरी, मजूर, कामगार, बारा बलुतेदार व इतर अडचणीत आलेल्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपानं काल केली होती तसंच मुंबईत परिस्थिती गंभीर असून रूग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी उपचारांची योग्य व पुरेशी व्यवस्था करावी, अशी अपेक्षाही ह्या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली होती मात्र राज्य सरकारला आर्थिक मदतीची गरज असताना केंद्राला पैसे द्यायचे आणि वरून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करायचे यामुळे भाजपचे हे आंदोलन जनतेला पटले नाही.