जामखेडची नर्स तीन लग्न करून मेडिकलवाल्याच्या प्रेमात , ‘ लग्नाळू ‘ तरुणाची फसवणूक

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आलेला असून जिल्ह्यातील जामखेड इथे कार्यरत असलेल्या एका परिचारिकेने विवाहाच्या बहाण्याने एका तरुणाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. सदर प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तक्रारदार तरुणाचे वय 34 वर्ष आहे . लग्नासाठी वधू मिळत नसल्याने त्याने यासंदर्भात आपल्या एका परिचित व्यक्तीला सांगितले आणि त्यानंतर सर्वांनी मिळून या व्यक्तीची फसवणूक केली.

उपलब्ध माहितीनुसार , शारदा विठ्ठल आरसुळ ( वय 33 वर्ष मूळ राहणार मांडवेवाडी डोंगरकिन्ही तालुका पाटोदा जिल्हा बीड ) भगवान दत्तोबा दुमाल आणि ईश्वर महादेव मुटकुळे ( दोघेही राहणार मांडवा तालुका आष्टी जिल्हा बीड ) तसेच बिभीषण अण्णासाहेब पडोळे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तक्रारदार तरुण यास भगवान दत्तोबा दुमाल आणि ईश्वर महादेव मुटकुळे या दोघांनी शारदा हिचे स्थळ सुचवलेले होते. सदर महिला ही आधी विवाहित असून विधवा असल्याकारणाने तिला मूलबाळ नाही याची आरोपींनी माहिती दिली त्यानंतर आरोपी महिलेने लग्नाची तयारी दाखवली.

31 जानेवारी 2023 रोजी हा विवाह देखील ठरला लग्नाच्या दोन-तीन दिवस अगोदर आधी आरोपी महिलेने स्वतःच्या नावाने शेतजमीन तसेच पाच लाख रुपयांची मागणी केली त्यानुसार तक्रारदार यांनी पाच लाख रुपये तिच्या अकाउंटवर ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि त्यानंतर 27 जानेवारी रोजी शेतजमीन ट्रान्सफर करण्याच्या वेळी तिने ही शेतजमीन मानलेला भाऊ असलेला बिबीशन अण्णासाहेब पडोळे ( राहणार केळसांगवी तालुका आष्टी ) या मेडिकल चालकाच्या नावावर ट्रान्सफर करण्यास सांगितले त्यानंतर तक्रारदार व्यक्ती यांनी त्याच्या नावावर एक एकर जमीन ट्रान्सफर देखील केली आणि 31 जानेवारी 2023 रोजी त्यांचा विवाह देखील बीड जिल्ह्यातील कपिलधार इथे पार पडला.

लग्नानंतर काही दिवस उलटल्यानंतर तक्रारदार व्यक्ती आणि शारदा यांनी आष्टी इथे राहण्यास सुरुवात केली त्यानंतर शारदा ही जामखेड येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे काम करत असायची त्यावेळी या प्रकरणातील आरोपी असलेला बिबीशन हा पती घरी नसताना तिच्या घरी जायचा आणि त्यानंतर एके दिवशी तक्रारदार व्यक्ती यांनी त्यांना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. लग्नानंतर अवघ्या एक महिन्यात हा प्रकार लक्षात आल्यानंतर शारदा हिने आपल्यासोबत लग्न केलेले आहे अशी तक्रारदार व्यक्ती यांची खात्री झाली.

तक्रारदार व्यक्ती यांनी तिला जाब विचारला त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावरून भगवान दत्तोबा दुमाल आणि ईश्वर महादेव मुटकुळे यांच्या सहाय्याने आपली फसवणूक झाल्याची त्यांना जाणीव झाली. सदर टोळक्याचा हा धंदा आहे याची देखील यांची खात्री झाली. शारदा हिने यापूर्वीचा पती विठ्ठल आरसूळ याच्यासोबत लग्न केल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला होता त्यानंतर दुसरा पती याच्यासोबत देखील एक विवाह तिचा झालेला होता मात्र तो तिला नांदवत नव्हता आणि तिसरा विवाह तक्रारदार व्यक्ती यांच्यासोबत केला आणि त्यानंतर ही चौथ्यांदा बिबीशन नावाच्या व्यक्तीच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध ठेवत होती.

25 जून 2023 रोजी शारदा आणि बिबीशन पडोळे यांनी तक्रारदार व्यक्ती यांना जिवे मारण्याची धमकी दिली सोबतच शेती आमच्या नावावर करून टाक अशी देखील त्यांनी धमकी दिली. आरोपी व्यक्तींनी आतापर्यंत शारदा हिला दिलेले पाच लाख रुपये आणि तिच्या अंगावरील दागिने तीन लाख 62 हजार रुपये असे घेऊन तसेच आरोपी बिबीशन याने शेती घेऊन आपली फसवणूक केलेली आहे असे सांगत पोलिसात धाव घेतलेली आहे. अशाच पद्धतीने या टोळक्याने आणखीन कुणाची फसवणूक केली आहे का ? याचा देखील पोलीस सध्या तपास करत आहेत.


शेअर करा