स्कुल बसचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार , हात कापण्याची धमकी दिली अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर इथे समोर आलेली असून शाळेची बस चालवणाऱ्या एका व्यक्तीने अवघ्या तेरा वर्षीय मुलीवर तिचा हात कापण्याची धमकी देत अत्याचार केलेला आहे. पोलिसांनी आरोपी स्कूलबस चालकाला तात्काळ अटक केलेली असून 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नितेश गजभिये ( वय 25 राहणार हुडकेश्वर नागपूर ) असे आरोपी चालकाचे नाव असून तो शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतो. पीडित मुलीची मैत्रीण ही आरोपीच्या स्कूल बसमध्ये प्रवास करत असल्याकारणाने पीडित मुलीची देखील आरोपीसोबत ओळख झालेली होती. 31 ऑगस्ट रोजी त्याने आरोपीला पीडित मुलगी ही सायकलवर जाताना दिसली म्हणून त्याने तिला थांबवले.

आरोपी व्यक्तीने त्यानंतर तिचा हात कापण्याची धमकी देत तिला निर्जन स्थळी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर या मुलीने आपल्या सोबत घडलेला प्रकार आई-वडिलांकडे कथन केला आणि त्यानंतर आई-वडिलांनी हुडकेश्वर पोलिसात दाखल होत आरोपीच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे .


शेअर करा