तब्बल साठ वर्षांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात ,अठरा वर्षांचा असताना..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक अजब प्रकरण चर्चेत आलेले असून यामध्ये पोलिसांच्या कार्यशैलीचे कौतुक करावे की टीका हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हे प्रकरण असून पोलिसांनी एका 78 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर चोरीचा आरोप असून त्यांनी ही चोरी तब्बल साठ वर्षांपूर्वी केलेली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1965 मध्ये एका व्यक्तीने दोन म्हशी आणि एक रेडकू चोरलेले होते. गणपती विठ्ठल वाघमोरे असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून परिसरात राहणारे मुरलीधर माणिकराव कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीच्या दोन म्हशी आणि एक रेडकू त्यांनी चोरलेले होते. कुर्की गावात म्हशी आणि रेडकू सापडले त्यानंतर वाघमोरे यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर जामीनावर ते बाहेर पडलेले होते.

जामिनावर बाहेर आल्यानंतर वाघमोरे फरार झाले आणि कुणाच्याही हाती आले नाहीत त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केलेले होते. पोलीस गेल्या काही वर्षांपासून त्यांना शोधत होते मात्र अखेर पोलिसांना ते आढळून आलेले असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करावे की टीका करावी असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे.


शेअर करा