आणखीन एक सरकारी बाबू ईडीच्या जाळ्यात , नव्यासाठी गाठायचा कोची

शेअर करा

सरकारी बाबूंच्या वरकमाईला कधी ब्रेक लागत नाही आणि अखेर मोठ्या प्रकरणात अडकले जातात असाच एक प्रकार सध्या मुंबईत समोर आलेला असून ईडीच्या अटकेत असलेला भारतीय महसूल सेवेतील अधिकारी सचिन सावंत यांचे अनेक कारनामे पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे. साउथचे अभिनेत्री असलेली नव्या नायर हिला भेटण्यासाठी किमान 20 वेळा तो कोची इथे गेलेला असल्याचे देखील समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सचिन सावंत याची सध्या ईडीकडून संपत्ती प्रकरणात चौकशी सुरू असून सावंत याचे नवी घर नवी मुंबईत घर आहे याच इमारतीमध्ये नव्या ही देखील काही काळ राहत होती. त्यांच्या मैत्रीची नवी मुंबईत देखील चर्चा होती त्यानंतर ती केरळला निघून गेली त्यानंतर सावंत हा तिला भेटण्यासाठी किमान 20 वेळा कोची इथे दाखल झालेला होता.

आत्तापर्यंतच्या तपासात त्याने तिला एक लाख 75 हजार रुपयांचा पायात घालण्याचा दागिना भेट दिल्याचे देखील समोर आलेले आहे. हा दागिना त्याने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावल्याचा ठपका ईडीने त्याच्यावर ठेवलेला आहे. सावंत याने सांगलीजवळ एका ठिकाणी सव्वा एकर जमीन देखील खरेदी केली होती आणि त्याच्याकडे तब्बल 16 लाख रुपयांची गाडी आहे. त्याने हे पैसे कुठून आणले याबाबत देखील सध्या तपास सुरू आहे.


शेअर करा