निवडणूक येताच भाजपला जनहिताची काळजी , 450 रुपयांना गॅस अन..

शेअर करा

लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे केंद्र सरकारकडून आणि राज्यांकडून देखील लोकहिताचे आणि लोकांना लक्षात ठेवून निर्णय घेण्यात सुरुवात झालेली आहे .मध्यप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण असून केंद्र सरकारने घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये 200 रुपयांची घट केल्यानंतर मध्यप्रदेश सरकारने गॅसच्या किमती साडेचारशे रुपयापर्यंत खाली आणण्याचा विचार सुरू केलेला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी यासंदर्भात घोषणा केलेली आहे.

मध्यप्रदेशमध्ये जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आलेली होती त्यावेळी या यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी ही घोषणा केलेली असून आता फक्त उज्वला योजनेसाठी नाही तर सरसकट गॅस सिलेंडर 450 रुपयांना मिळेल त्यासाठी आम्ही कार्यवाही करत आहोत , असे त्यांनी म्हटलेले आहे

शिवराज सिंग चव्हाण म्हणाले की , आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 60 टक्के गुण घेणाऱ्या मुलांना लॅपटॉप आणि प्रत्येक शाळेतील तीन मुलांना स्कुटी देण्याचा संकल्प आम्ही जाहीर केलेला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजय वर्गीय यांच्यासोबत मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि स्थानिक नेते देखील यावेळी उपस्थित होते.


शेअर करा