
नगर शहरातील फकीरवाडा मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात चक्क औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नाचणारा सर्फराज जहागीरदार याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले असून पोलिसांच्या अहवालानुसार प्रांतअधिकारी यांनी यासंदर्भात आदेश काढलेले आहेत. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावेळी नागरिकांमधून याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
अहमदनगरच्या फकीरवाडा भागात एका धार्मिक कार्यक्रमात हा तरुण चक्क औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचताना आढळून आलेला होता.सदर युवक हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असून त्याने स्वतःच्या प्रोफाईलला रील्समध्ये हा व्हिडीओ ठेवलेला होता . औरंगजेबाचा फोटो झळकवणारा युवक हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला असण्याची देखील नगरकरांमध्ये चर्चा होती .
नगर येथील या घटनेत स्पष्टपणे फोटोच्यावरती चक्क औरंगजेब (रहे) असे मराठीत लिहिलेले होते आणि सोबतच स्टेटसमध्ये आक्षेपार्ह आणि भावना भडकावणारा मजकूर ठेवण्यात आलेला होता. इस्लाममध्ये मुळातच डान्स आणि मिरवणूक या गोष्टीना स्थान नाही मात्र तरीही असा प्रकार आणि तो देखील धार्मिक भावना भडकावणारा असल्याने अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी मुस्लिम बांधवांकडूनच केली जात होती .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराभव करण्यासाठी औरंगजेबाने क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा पार केलेल्या होत्या त्यातून त्याने आपला स्वतःचा सख्खा भाऊ आणि वडिलांना देखील सोडले नाही मात्र तरीदेखील अशा व्यक्तीच्या वर्तणुकीबद्दल काही लोक सहानुभूती दाखवत असल्याने अशा शहरातील अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात शहरात संतापाची लाट आहे. सदर फ्लेक्स बोर्ड छापून मिरवण्यापर्यंत पोलिसांची गुप्त सूत्रे काय करत होती ? हा देखील प्रश्न आहे .