
देशातील लोकशाही वाचवण्याच्या उद्देशाने विरोधकांच्या बनवलेल्या इंडिया आघाडीच्या नावाचा धसका घेतल्यानंतर केंद्राने देशाचेच नाव बदलण्याचा घाट रचलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांशी कुठलाही संबंध नसणारे मुद्दे चर्चेत आणायचे आणि त्यातच नागरिकांना गुरफटत ठेवायचे अशी केंद्राची कार्यशैली आता सर्वसामान्य नागरिकांना परिचयाची झालेली असून बॉलीवूड डायरेक्टर आणि अभिनेता अनुराग कश्यप यांनी देखील या विषयावर भाष्य करत एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागतो असे म्हटलेले आहे. अनुराग कश्यप यांचा निशाणा पंतप्रधान मोदी यांच्यावर आहे.
अनुराग कश्यप म्हणाले की ,’ आपल्या देशाचे नाव बदलण्याचा निर्णय जर घेतला तर पुन्हा एकदा करामधून जो निधी देशाला मिळालेला आहे त्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होईल कारण इंडिया आणि भारतमध्ये जर भारत नाव ठेवले तर सगळ्या अधिकृत कागदपत्रावर हे नाव आणावे लागेल. सगळेच दस्तावेज नव्याने छापावे लागतील त्यामध्ये नोटांचा देखील समावेश आहे. एका लहरी माणसाच्या निर्णयाचे परिणाम सगळ्या देशाला भोगावे लागतील. मागचा पुढचा विचार न करता निर्णय घेतला की आणखी काय होणार ?, ‘
अनुराग कश्यप पुढे म्हणाले की , ‘ एका माणसाच्या लहरी निर्णयामुळे बँकांमधील सगळ्या नोटा बदलाव्या लागतील. शिक्षणाच्या पदव्या बदलून घ्याव्या लागतील. सगळ्यांना देण्यात आलेल्या कोरोना लसीची प्रमाणपत्र देखील बदलावी लागतील . मला एका गोष्टीचे उत्तर द्या तुम्ही पुन्हा पुन्हा काय छापणार ? ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लोकांनी फक्त वाट बघायची का ? तोपर्यंत लोकांना रेशन मिळणार नाही का? लोकप्रवास करू शकणार नाहीत का? या प्रश्नाची उत्तरे मिळायला हवीत , ‘ असे म्हटलेले आहे.