चित्राताई तुमचा भाऊ राज्यभर उघडा फिरतोय , किरीट सोमयांसाठी ड्रेस पाठवला

शेअर करा

ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये भाजपच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला होता. भाजपचे नेते देखील त्यानंतर आक्रमक झालेले पाहायला मिळत असून राजकारणातील भाषेची पातळी दिवसेंदिवस घसरत असल्याचे दिसून येत आहे.

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना जोकरचा ड्रेस मातोश्रीवर पाठवणार असल्याचे म्हटलेले होते त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून देखील जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी किरीट सोमय्या यांच्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे एक ड्रेस पाठवलेला आहे.

शरद कोळी यांनी यावेळी बोलताना , ‘ चित्राताई तुमचा भाऊ राज्यभर उघडा फिरतोय त्यामुळे तुमच्या पक्षाची आणि त्याची इज्जत जात आहे म्हणून आम्ही किरीट सोमय्या यांना आमच्यातर्फे ड्रेस पाठवून देत आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना थोडी तरी वाटायला पाहिजे. मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी तुम्ही बिनधास्त आपण एवढे बोलून उठून जायचं असे बोलताय . हे तीन तोंडी सरकार कुठल्याही समाजाला न्याय देणार नाही. जातीच्या नावावर केवळ मत मागतील आणि वाऱ्यावर सोडतील , ‘ असे म्हटलेले आहे.


शेअर करा