पैशाच्या बदल्यात पेपरची रद्दी देऊन गायब , नगर जिल्ह्यातील घटना

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना सध्या समोर आलेली असून पाच मिनिटात तुम्हाला पैसे डबल करून देतो असे सांगत तीन आरोपींनी एका व्यक्तीची तब्बल साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे. आरोपींनी पैसे डबल करण्याच्या बहाण्याने समोरील व्यक्तीला पेपरच्या रद्दीची पिशवी दिली आणि त्यानंतर तिथून पलायन केले. लोणी पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जितेंद्र ममता साठे ( वय 36 राहणार वासुंदे तालुका पारनेर), अरुण सुरेश शिंदे ( वय 24 राहणार वरवंडी फाटा तालुका संगमनेर ) आणि अन्वर अब्दुल्ला पठाण ( वय 48 राहणार मुंढवा पुणे ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून लोणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे . त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आलेली आहे.

तक्रारदार व्यक्ती असलेले बाबासाहेब वसंत सूर्यवंशी यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केलेली असून आरोपींनी त्यांना पतसंस्थेत सुद्धा सहा वर्ष आधी रक्कम दामदुप्पट होत नाही असे सांगत तुमची रक्कम काही मिनिटात दाम दुप्पट करून देतो असे सांगितले होते. सराईत आरोपीने त्यानंतर फिर्यादी यांना फोन करून लोणी येथे भेटण्यासाठी बोलावले आणि पाच मिनिटात तुमचे पैसे डबल करून देतो असे आमिष दाखवले.

धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदार व्यक्ती यांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आरोपींनी त्यांना पैशाच्या बदल्यात पेपरची रद्दी दिली आणि त्यानंतर तेथून पलायन केले. तक्रारदार व्यक्ती यांनी पाकीट फोडले त्यावेळी त्यामध्ये पेपरची रद्दी असल्यानंतर त्यांनी लोणी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि आरोपींना पुणे जिल्ह्यातील शिरूर इथून ताब्यात घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर , शिर्डीचे पोलीस उपअधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल जोसेफ साळवी , पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे यांनी याप्रकरणी तपासकामी महत्त्वाची भूमिका बजावली.


शेअर करा