क्षीरसागर इथेच राहतात का ? ‘ म्हणत केडगावमध्ये घरात घुसले अन..

शेअर करा

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना केडगावातील भूषणनगर इथे समोर आलेली आहे . . क्षिरसागर इथेच राहतात का ? असे म्हणत एका घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नऊ जणांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला यांच्या पतीचा डेअरीचा व्यवसाय असून शनिवारी रात्री ते घरी असताना पावणेअकराच्या सुमारास त्यांच्या घरासमोर नऊ जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी क्षीरसागर इथेच राहतात का ? असे म्हणत महिलेकडे विचारणा केल्यानंतर अचानक घरात घुसले आणि त्यांनी क्षिरसागर यांना शिवीगाळ केली आणि आरोपीपैकी तीन जणांनी महिलेला ढकलून दिले. फिर्यादी यांचे पती जेवण करत होते त्यावेळी त्यांना तू बाहेर ये तुझ्या हातपाय तोडतो , अशी धमकी दिली आणि आरोपी तिथून निघून गेले असे फिर्यादीत म्हटलेले आहे.


शेअर करा