बापाचा खून करणारा धरला , श्रीरामपूरमध्ये घरातच बसला होता लपून

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना श्रीरामपूर तालुक्यात समोर आलेली असून श्रीरामपूर जवळ असलेल्या गोंधवणी इथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून बापाचा खून करणाऱ्या एका मुलाला शहर पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकलेल्या आहेत. 31 ऑगस्ट रोजी बापाला जबरी मारहाण करून तो घरात लपून बसलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , दिलीप साहेबराव शेळके ( वय 55 राहणार गोंधवणी ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून त्यांचा मुलगा असलेला बबलू दिलीप शेळके ( राहणार गोंधवणी ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने वडिलांना मारहाण केल्यानंतर ते बेशुद्ध झालेले होते त्यानंतर शहर पोलीस यांनी तात्काळ धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता.

आरोपी बबलू हा मारहाण केल्यानंतर घरात लपून बसलेला होता मात्र पोलीस आलेले पाहत असल्याने घरातून पलायन केले मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलेले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे , दादाभाई मगरे , रघुनाथ खेडकर , मच्छिंद्र काकडे , संभाजी खरात यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलेले आहे.


शेअर करा