माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी अखेर..

शेअर करा

नगर येथील जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या संदर्भात १५६/३ प्रमाणे तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी माया देशमुख यांनी हा आदेश दिलेला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून न्यायालयात धाव घेतल्यावर पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

एडवोकेट अभिषेक विजय भगत यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून भगत हे बुऱ्हानगर येथील देवीचे मुख्य पुजारी म्हणून काम पाहतात . त्यांनी स्वतः कर्डिले पितापुत्राच्या विरोधात पोलिसात धाव घेतलेली होती. एडवोकेट अभिषेक भगत यांनी 23 सप्टेंबर 2022 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शिवाजी कर्डिले आणि इतरांच्या विरोधात तक्रार केली मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.

अभिषेक भगत यांनी त्यानंतर जिल्हा न्यायालयात 3 जुलै 2023 रोजी फिर्याद दाखल केलेली होती. फिर्यादीमध्ये शिवाजी कर्डिले यांनी अभिषेक भगत यांना शिवीगाळ करत ‘ तुझा गोविंद मोकाटे करतो तुला बाईच्या गुन्ह्यात अडकवतो ‘ असे म्हणत धमकी दिलेली होती. शहरातील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या मोबाईलवर देखील त्यांनी भगत यांच्यासाठी एक धमकीवजा संदेश दिलेला होता. त्याचा देखील संदर्भ घेत कोर्टाने नऊ तारखेला तपासाचे आदेश दिलेले आहेत .


शेअर करा