सासुरवाडीत बायको तर नाही भेटली पण ‘ मुका मार ‘ मिळाला

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला बायकोऐवजी सासुरवाडीच्या लोकांकडून बेदम चोप मिळालेला आहे. शुक्रवारी ही घटना मसले चौधरी येथे घडलेली असून 45 वर्षीय व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दादासाहेब उत्तरेश्वर चव्हाण ( वय 45 राहणार नरखेड तालुका मोहोळ ) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी माहेरी गेलेली होती म्हणून तिला आणण्यासाठी ते शुक्रवारी आठ तारखेला सासुरवाडीला पोहोचलेले होते. तिथे गेल्यानंतर गणेश बाबासाहेब सिरसट आणि इतर तीन जणांसोबत त्यांचा वाद झाला त्यानंतर त्यांना गणेश आणि इतर काही जणांनी लोखंडी रोड आणि पाईपने मारहाण केली..

आरोपींनी केलेल्या मारहाणीत त्यांच्या हाताला खांद्याला आणि सर्वांगाला मुका मार लागलेला असून मोहोळ येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले उपचारातून प्रकृती बरी झाल्यानंतर अखेर त्यांनी सिव्हिल पोलीस चौकीत जाऊन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.


शेअर करा