आमदार निलेश लंके यांनी दिले तहसीलदारांना निवेदन , म्हणाले की..

शेअर करा

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करत लाठीचार्जचा निषेध केलेला असून मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केलेली आहे. तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.

आमदार निलेश लंके यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या नागरिकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे अनेक तरुण आणि माता-भगिनी जखमी झालेले आहेत हे अत्यंत निंदनीय घटना असून आपण या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत.

सदर घटनेची शासनाने सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे आपण या प्रकरणी निश्चितपणे सरकारकडे पाठपुरावा करणार असून मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची आग्रही भूमिका आहे. सरकार दरबारी आपल्या भावना कळाव्यात म्हणून आपण ही निवेदन देत आहोत , असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा