हत्या की आत्महत्या ? अखेर ‘ त्या ‘ तरुणाचा मृतदेह आढळला 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना अकोले शहरात समोर आलेली असून शाहूनगर येथील रहिवासी असलेल्या एका 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह शेटेमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लेंडी नाल्याच्या बाजूला एका बांधकाम केलेल्या विहिरीत आढळून आलेला आहे. त्याची हत्या आहे की आत्महत्या याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , मयूर अण्णासाहेब पवार असे मयत तरुणाचे नाव असून सात तारखेला दुपारपासून तो बेपत्ता झालेला होता. अकोले पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद देखील देण्यात आली आणि त्याचा शोध सुरू झालेला होता. मयूर हा नुकताच सीआरपीएफमध्ये भरती झालेला होता. 15 सप्टेंबर रोजी तो दिल्ली इथे ट्रेनिंगला जाणार होता त्यासाठी कुटुंबाने देखील संपूर्ण तयारी केली होती मात्र त्यानंतर सात तारखेला तो मित्राचा मोबाईल दुरुस्त करण्यासाठी चाललेलो आहे असे सांगून घरातून निघून गेला. 

बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला संपर्क केला मात्र त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो मिळून आला नाही म्हणून अखेर पोलीस ठाण्यात तो गायब असल्याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत तपासाला सुरुवात केली मात्र याच दरम्यान एका बांधकाम केलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा