राहुरी शहराला एक छदाम निधी न देणारे , प्राजक्त तनपुरे यांचा विरोधकांवर निशाणा

शेअर करा

‘ राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राहुरीच्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा प्रस्ताव करून त्यासाठी तांत्रिक मंजुरी मिळवण्यात आली. प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत असताना अचानकपणे सरकार बदलले आणि आम्ही केलेल्या कामाचे क्रेडिट घेण्यासाठी दुसरेच लोक पुढे आले. सध्या राहुरीत विरोधकांचा अशाच पद्धतीने श्रेय घेण्याचा आटापिटा सुरू आहे , अशी टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी इथे बोलताना केलेली आहे . महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत योजनेच्या 92 कोटीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाच्या प्रारंभ प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते.

प्राजक्त तनपुरे म्हणाले की , ‘ विरोधकांनी मोठा गाजावाजा करून भुयारी गटारकामाचा प्रारंभ केला मात्र आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ झालेला आहे या योजनेचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला होता त्यानंतर वाढती लोकसंख्या आणि तांत्रिक अडचणीत योजना रखडणार नाही यासाठी बदल देखील केले. मंत्रीपदाच्या काळात बैठका घेतल्या आणि तांत्रिक मंजुरी देखील मिळवली मात्र प्रशासकीय मंजुरी मिळवणे बाकी होते त्यासाठी सुमारे अडीच ते तीन वर्षे पाठपुरावा केला मात्र सत्ता बदलल्यानंतर विरोधकांनी या कामाचे क्रेडिट घेण्यासाठी आटापिटा सुरू केला. दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात राहुरी शहराला एक छदाम निधी न देणारे आम्ही केलेल्या कामाची क्रेडिट घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यांना आणि त्यांच्या निष्क्रिय कार्यकर्त्यांना राहुरीतील जनता ओळखून आहे , ‘ असे त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा