रात्रपाळीच्या परिचारिकेला अश्लील मेसेज पाठवला , अखेर तो कर्मचारी निलंबित

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आलेला असून एका 55 वर्षीय शिपायाने कंत्राटी काम करणाऱ्या नर्सला व्हाट्सअपवर अश्लील मेसेज पाठवलेला आहे. नर्सने तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी करून अहवाल देण्यात आला आणि त्यानंतर या शिपायाला निलंबित करण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सय्यद अतिक सय्यद रफिक असे शिपाई म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीचे नाव असून पाच ऑगस्ट रोजी त्याची रात्रपाळीची ड्युटी आरोग्य केंद्रात होती . त्याच दिवशी एक कंत्राटी परिचारिका देखील कर्तव्यावर होत्या. त्या एकट्या असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने त्यांना व्हाट्सअपवर अश्लील मेसेज पाठवले.

पीडित नर्स यांनी त्यानंतर हा प्रकार वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना सांगितला त्यानंतर चौकशी करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांच्यामार्फत अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी अविनाश पाठक यांना देण्यात आला आणि त्यानंतर शुक्रवारी या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेले आहे.


शेअर करा