
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असला तरी देखील नगर शहरात रस्त्यांची दुर्दशा मोठ्या प्रमाणात झालेली असून शहरातील पथदिवे अनेक ठिकाणी अद्यापही बंद आढळून येत आहेत. नगर शहरातील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस स्टेशनपासून तर गुलमोहर रोड कुष्ठधाम रोडला जिथे मिळतो त्या ठिकाणापर्यंत काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक पोल उभे करण्यात आलेले होते मात्र पोल उभे केल्यानंतर तिथे अद्याप एकही एलईडी लाईट बसवण्यात आलेली नाही.मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे.
तोफखाना पोलीस स्टेशनपासून गुलमोहर रोड कुष्ठधाम रोडला जिथे मिळतो त्या ठिकाणापर्यंत सुमारे २० पोल रस्त्याच्या मधोमध उभे करण्यात आलेले आहेत . रस्त्याच्या मधोमध असलेल्या पोलवर कुठल्याही पद्धतीचे रिफ्लेक्टर आणि डिव्हायडर लावण्यात आलेले नाहीत तसेच या पोलवर अद्याप एकही एलईडी लाईट काही महिने उलटूनही देखील लावण्यात आलेली नाही. रात्रीच्या सुमारास हे पोल सहजासहजी दृष्टीपथात येत नाहीत त्यामुळे पोलला धडकून जीविताचा धोका निर्माण झालेला आहे.
तोफखाना पोलीस स्टेशनपासून तर भिस्तबाग चौकापर्यंत जे पोल उभे करण्यात आलेले आहेत त्यामध्ये देखील कुठल्याही पद्धतीचे डिव्हायडर लावण्यात आलेले नाहीत सोबतच पोलवर रिफ्लेक्टर देखील लावण्यात आलेले नाहीत अन गुलमोहर रोडपासून तोफखाना पोलीस स्टेशनपर्यंतच्या पोलमध्ये डिव्हायडर सोडाच पण साधे रेडियमचे रिफ्लेक्टर देखील लावले नसल्याने रात्रीच्या वेळी या पोलचा काहीही फायदा होत नसून उलट जीविताला धोका निर्माण झालेला आहे.
इलेक्ट्रिक पोलवर साधे रेडियम लावले तरी काही प्रमाणात अपघाताचा धोका टाळला जाऊ शकेल मात्र तितकी ही काळजी घेण्यात आलेली नसल्याने लवकरात लवकर या पोलवर एलईडी लाईट बसवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने या रोडवर अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळत असून अपघात होण्याची वाट पाहिली जात आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक आता विचारत आहेत