नगर चौफेर वेबसाईटच्या बातम्यांसोबत छेडछाड तसेच काही पोस्ट डिलीट

शेअर करा

नगर चौफेर वेबसाईट काही सायबर गुन्हेगारांनी हॅकिंग करण्याचा प्रयत्न केलेला असून वेबसाईटवरील काही बातम्या या डिलीट करण्यात आलेल्या आहेत तर काही पोस्ट तथा बातम्यांसोबत छेडछाड करण्यात आलेली आहे .

गेल्या काही महिन्यांपासून वेबसाईटवर सातत्याने सायबर हॅकर्सकडून वेबसाईट स्लो करण्याच्या उद्देशाने तसेच वेबसाईटच्या ऍडमिन पॅनेलचा ऍक्सेस घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते आणि दुर्दैवाने सायबर हॅकर्सला त्यात काही तासांसाठी यश आले. वेबसाईटवरील काही पोस्ट यामध्ये डिलीट करण्यात आल्या तर काही पोस्टच्या बातम्यांमध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे. त्यामुळे काही पोस्ट जुन्या लिंकच्या आधारे ओपन करण्याचा प्रयत्न केला तर असा मेसेज येत असून शक्य तितक्या बातम्या पुन्हा रिस्टोअर केल्या जात आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती.


शेअर करा