पाच लाख दे नाहीतर तुला.., प्रेयसीपुढे हतबल तरुणाचे टोकाचे पाऊल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर शहरात समोर आलेली असून पाच लाख रुपयांचे खंडणी दिली नाही तर तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी मिळाल्यानंतर हतबल झालेल्या एका तरुणाने नदीत उडी घेत आपल्या आयुष्याचा अंत केलेला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडलेली असून आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने स्वतःची आपबिती फेसबुक लाईव्हवर सांगितलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मनीष रामपाल यादव असे मयत तरुणाचे नाव असून त्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा मनीष रामपाल यादव असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे एका 19 वर्षीय तरुणीसोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती देखील होती मात्र त्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद देखील झाले आणि पुन्हा मनोमिलन देखील झाले . काही दिवसानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोपी मयत मनीष याला धमकवण्यास सुरू केले त्यामध्ये पाच लाख रुपये दे नाहीतर तुला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू अशी देखील धमकी देण्यात आलेली होती.

नागपुरच्या मिनीमाता नगर परिसरात मनीष यादव राहायचा. रविवारी सकाळी 10 च्या सुमारास मनीष घरातून टू व्हिलर घेऊन निघाला. त्याने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवला आणि त्यांच्यासोबत घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती त्याने या व्हिडिओत दिली. या व्हिडिओनंतर मनीषने फेसबूक लाईव्ह देखील केले यामध्ये त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.या सर्व घटनेनंतर मनीषने मोबाईल डिक्कीमध्ये ठेऊन दिला आणि कन्हान नदीच्या दिशेने जात उडी घेऊन आत्महत्या केली.


शेअर करा