
महाराष्ट्रात लग्नानंतर विवाहित महिलांना पैशासाठी त्रास देण्याचे प्रकार रोज समोर येत असून अनेक काही ठिकाणी तर चक्क साखरपुडा झाल्यापासूनच पैशासाठी त्रास दिल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना सातारा शहरात समोर आलेली असून एका नामांकित हॉटेलमध्ये तब्बल दहा लाख रुपये साखरपुड्याला खर्च केल्यानंतर लग्न करण्यास मुलाकडच्या मंडळींनी लग्नास नकार दिला आणि वधूच्या पित्याची फसवणूक करण्यात आली . सातारा शहर पोलिसात याप्रकरणी एका डॉक्टरसह तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर गिरीश बाळकृष्ण कदम , बाळकृष्ण बाजीराव कदम , शीला बाळकृष्ण कदम ( राहणार शाहूनगर गोडोली सातारा ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून तक्रारदार व्यक्ती यांचे वय 70 वर्षे आहे. ते मूळचे मुंबई येथील असून त्यांच्या डॉक्टर मुलीसोबत संशयित व्यक्ती यांनी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये साखरपुडा केलेला होता त्यानंतर लग्न मोडल्याने आपली बदनामी झाली असे त्यांनी तक्रारीत म्हटलेले आहे.