मित्रांसाठी गोव्याहून गिफ्ट आणलं होत , सुसाईड नोट लिहून हॉटेल व्यावसायिकाने अखेर..

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या मध्य प्रदेशातील इंदोर इथे समोर आलेले असून एका हॉटेल संचालकाने स्वतःवर गोळी झाडून आयुष्याचा शेवट केलेला आहे. बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केलेल्या पिस्तुलातून त्यांनी गोळी मारली मात्र त्याआधी सात पानांची सुसाईड नोट लिहून ठेवून घराच्या भिंतीवर देखील काही मेसेज त्यांनी लिहिलेले होते. सदर हॉटेल संचालक हा मानसिक तणावाखाली होता.

उपलब्ध माहितीनुसार , आदित्य असे या व्यावसायिकाचे नाव असून घटना घडली तेव्हा कुटुंबात आई आणि भाऊ घरातील वरच्या मजल्यावर होते. आदित्य हा खालच्या रूममध्ये थांबलेला असताना त्याने स्वतःवर गोळी झाडली. सुसाईड नोटमध्ये त्याने वयाच्या तिसाव्या वर्षीच आत्महत्येचा विचार केलेला होता असे सांगितले असून टीव्ही दरवाजा आणि घराच्या भिंतीवर त्याने मित्र आणि नातेवाईकांसाठी मेसेज लिहिलेले होते

वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या मेसेजमध्ये त्याने सर्व गेट मीच खोलले आहेत माझ्या मृत्यूची बातमी सर्वात आधी पोलिसांना द्या माझ्या कुठल्याही सामानाला हात लावू नका. एका सुसाईड नोटमध्ये त्याने मी सिद्धू मुसावलाचा फॅन आहे असे देखील त्याने सांगितलेले आहे सोबतच एका निळ्या रंगाच्या थैलीवर त्याने हे मी गिफ्ट खास माझ्या मित्रांसाठी गोव्यावरून आणलेले आहे मात्र त्यांना देऊ शकलो नाही ज्या मित्रांना ही गिफ्ट द्यायचे आहे, त्यांची देखील नावे त्याने लिहून दिलेली आहेत .

आदित्य याने 2016 मध्ये हे पिस्तूल बेकायदेशीररित्या खरेदी केलेले होते. इंदूर येथील मारुती नगर इथे तो राहत असायचा पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केलेली असून ही बेकायदेशीर पिस्तूल त्याच्याकडे कशी आली आणि कुणाकडून त्याने ते विकत घेतली याच्यासोबतच त्याच्या आत्महत्येचे कारण काय आहे याचाही तपास सुरू करण्यात आलेला आहे .


शेअर करा