त्या तिन्ही अल्पवयीन मुलींची ‘ नगर वापसी ‘ , बॉयफ्रेंडसोबत दिवसभर फिरल्या अन..

शेअर करा

नगर शहरातून तीन अल्पवयीन मुली 12 तारखेला बेपत्ता झालेल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आणि अखेर या तीनही मुलींना हैदराबाद येथून परत आणण्यात आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिवसभर नगरमध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरल्यानंतर आई-वडिलांच्या भीतीपोटी घरी न जाता रात्री त्या रेल्वे स्टेशनला पोहोचल्या आणि रेल्वेवरून पुण्याला आणि तिथून हैदराबादला गेलेल्या होत्या. हैदराबादला गेल्यानंतर कुठे मदत मिळेना म्हणून त्या तेथील पोलीस स्टेशनला गेल्या आणि आपण आई-वडिलांच्या भीतीपोटी इथे आलेलो आहोत असे त्यांनी सांगितले.

तीनही अल्पवयीन मैत्रिणींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून शासकीय वाहनातून त्यांची बडदास्त ठेवत त्यांना नगर इथे आणण्यात आलेले आहे. हतबल झालेल्या कुटुंबीयांकडून मुलींना पळवून नेण्याचा गुन्हा पोलिसात नोंदवण्यात आलेला होता. ज्या बॉयफ्रेंडसोबत त्या फिरायला गेलेल्या होत्या त्यांची देखील तोफखाना पोलिसांनी चौकशी केली असून त्यांनी मुलींना नगरमध्ये पुन्हा आणून सोडलेले होते मात्र त्यातील एक मुलगी घरी गेली मात्र इतर तिघी घरी जाण्यास घाबरत होत्या त्यानंतर या मुलीने त्या कुठे गेल्या याची मला माहिती नाही इतकेच सांगितले मात्र पोलिसांनी तेवढ्या आधारावर तपासाला सुरुवात केलेली होती.

नगर शहरात यानंतर अल्पवयीन मुलींना पळवल्याची जोरदार चर्चा सुरू झाली मात्र त्यांना पळवून नेल्याचे कुठलेही तपासात समोर आले नाही . तीनही अल्पवयीन मुली या शाळेत जात आहे म्हणून घराबाहेर पडलेल्या होत्या आणि दिवसभर बॉयफ्रेंडसोबत फिरल्यानंतर संध्याकाळी नगरमध्ये आल्या मात्र आई-वडिलांच्या भीतीपोटी घरी जाण्याचे धाडस होईना म्हणून त्यांनी त्यांच्या बॉयफ्रेंडकडे आम्ही घरी जाऊ शकत नाही आमची राहण्याची सोय करा , असे सांगितले होते मात्र त्यांच्या मित्रांनी यासाठी हात वर केले त्यामुळे हतबल झाल्यावर त्यांनी रेल्वे स्टेशन गाठले.

रेल्वे स्टेशन गाठल्यानंतर कुठे जावे समजेना म्हणून त्या आधी पुण्याला गेल्या आणि त्यानंतर तिथून डायरेक्ट हैदराबादला गेल्या. हैदराबादला गेल्यानंतर एका हॉटेलवर राहण्यासाठी म्हणून गेल्या मात्र त्या अल्पवयीन असल्याकारणाने हॉटेल चालक यांनी त्यांना पोलिसात जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर त्या पोलिसात गेल्या आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली व त्यानंतर तोफखाना पोलिसांशी संपर्क केला. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे यांचे एक पथक हैदराबादला गेले आणि या तीनही मुलींना पुन्हा नगरला आणण्यात आले.


शेअर करा