कोपर्डी प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येची चौकशी होणार , नेमकं काय घडलं ?

शेअर करा

संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने कारागृहातच टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.

येरवडा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार , आरोपी जितेंद्र शिंदे हा मानसिक रुग्ण होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आलेले होते. लोखंडी पट्टीवर टॉवेलच्या साह्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे गस्तीवरील असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर कारागृह अधीक्षक यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि त्याचे शव खाली उतरवून पंचनामा करण्यात आला. ससून रुग्णालय त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्यात आलेला आहे.

आरोपी जितेंद्र याच्यावर कारागृह मनोरुग्न तज्ञ यांच्या सल्ल्याने औषध उपचार देखील नियमितपणे सुरू होते. सदर प्रकरणाची चौकशी होण्याबाबत न्यायदंडाधिकारी पुणे यांना विनंती करण्यात आलेली असून आरोपीने तुरुंग कारागृहात गळफास घेतल्यानंतर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे मात्र तुरुंगात किंवा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानंतर चौकशी ही कायदेशीर प्रक्रिया आहे.

13 जुलै 2016 रोजी संध्याकाळच्या वेळी पीडित मुलगी तिच्या आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती त्यावेळी घरी परत येत असताना आरोपी जितेंद्र शिंदे याने तिला अडवले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मुलगी घरी परतली नाही म्हणून आईच्या सांगण्यावरून चुलत भाऊ शोध घेत असताना त्याला बांधावरील लिंबाच्या झाडाखाली आरोपी जितेंद्र शिंदे उभा असल्याचे दिसले. मुलीच्या भावाला पाहिल्यानंतर आरोपी जितेंद्र शिंदे हा तेथून पळून गेलेला होता. इतर तीन जणांनी देखील त्याला पळून जाताना पाहिलेले होते. 29 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलेली होती. संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत.


शेअर करा