श्रीरामपूरमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाचे टोकाचे पाऊल

शेअर करा

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहरात एक दुर्दैवी घटना समोर आलेली असून खाजगी सावकाराच्या तगाद्याला वैतागून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आरोपी सावकार याने पैशाच्या वसुलीसाठी या तरुणाच्या घरातील गाडीसह इतर वस्तू गहाण ठेवलेल्या होत्या आणि तगाद्याला वैतागून अखेर या तरुणाने गळफास घेतला.

उपलब्ध माहितीनुसार , स्वप्निल पुरुषोत्तम तुपे ( वय 35 ) असे मयत तरुणाचे नाव असून ते श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावर एका दुकानात काम करत असायचे. त्यांनी सावकार असलेला आनंद पाटील याच्याकडून पंधरा हजार रुपये व्याजाने घेतलेले होते आणि त्यासाठी काही वस्तू गहाण ठेवलेल्या होत्या मात्र सावकाराच्या तगाद्याला ते अखेर वैतागून गेले आणि त्यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. आनंद पाटील याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा