‘ आपल्याला काय बोलायचं आणि निघून जायचं , ‘ त्या ‘ व्हिडिओनंतर मराठा बांधवात संताप

शेअर करा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सध्या वातावरण तापलेले असून याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीच्या दरम्यानचा एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ असून तीनही नेत्यांवर यानंतर मराठा समाज बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा व्हिडिओ एडिट केलेला असल्याचे देखील म्हटलेले आहे.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला असून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत महायुतीचे ‘ वरून कीर्तन आतून तमाशा ‘ चालला आहे अशा खोचक शब्दात टीका केलेली आहे. राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकाराबद्दल किती गंभीर आहेत ते समोर आलेले असून मराठा आरक्षणाबाबत बोलण्याआधी या तिघांमध्ये सुरू असलेली चर्चा माइक सुरू राहिल्याने ऐकू आली तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांना याची जाणीव करून दिली वारे वा शिंदे सरकार ‘ असे म्हटलेले आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील बोलून मोकळे होणाऱ्या या तिघांचेही ‘ आग लगे बस्ती मे हम अपने मस्ती मे ‘ अशी टीका केलेली आहे .

मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या कथित व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘ आपल्याला काय बोलायचं आणि निघून जायचं बोलून मोकळ व्हायचं ‘ असे म्हणतात तर उपमुख्यमंत्री अजित पवार ‘ हो एस ‘असे म्हणतात मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे माइक चालू आहे असे म्हणतात सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून मराठा समाज बांधवांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत . राज्य सरकार मराठा बांधवांच्या प्रश्नांवर गंभीर नाही असा देखील आरोप या व्हिडिओनंतर केला जात आहे


शेअर करा