बहुचर्चित रेखा जरे खून खटल्याची सुनावणी आता ‘ ह्या ‘ तारखेला

शेअर करा

संपूर्ण नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या नगर येथील बहुचर्चित रेखा जरे खून खटल्याची आता 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे यावेळी सर्व आरोपींना हजर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची गाडी अडवून त्यांचा खून करण्यात आला होता. रेखा जरे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस तपास सुरू असताना जरे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मुलाने मोबाईलमध्ये एका आरोपीचा फोटो काढला असल्याचे समोर आले अन त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशीच एका आरोपीला अटक केली अन त्यानंतर आणखी तीन जणांना अटक केली त्यावेळी हत्येपाठीमागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा असल्याचे समोर आले. सागर भिंगारदिवे याच्यामार्फत त्याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी त्याला दिली होती.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी आदित्य चोळके आणि सागर भिंगारदिवे यांनी नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केले असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे. एडवोकेट उमेश चन्द्र यादव विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. सदर हत्याकांडाचा काय निकाल लागतो याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आरोपी बाळ बोठे याच्या वतीने एडवोकेट महेश तवले तर सागर भिंगारदिवे याच्या वतीने एडवोकेट रोमन सय्यद हे काम पाहत आहेत. सागर भिंगारदिवे आणि आदित्य चोळके यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यांच्या जामीन अर्जावर फिर्यादीचे वकील एडवोकेट सचिन पटेकर यांनी आक्षेप घेतलेला असून जामीन देऊ नये अशी मागणी केलेली आहे. पुढील सुनावणीच्या वेळी सर्व सहा आरोपींना हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिलेले आहेत.


शेअर करा