‘ मी अजातशत्रू ‘ म्हणत उज्वल निकम भाजपमध्ये , म्हणाले की.. 

शेअर करा

दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांना मुंबई उत्तर लोकसभेसाठी तिकीट मिळणार होते मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. उज्वल निकम आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असून अनेक महत्त्वपूर्ण खटले त्यांनी सरकारच्या वतीने लढवले आहेत. 

उज्वल देवराव निकम असे त्यांचे पूर्ण नाव असून मुंबई उत्तर मध्य मधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सद्य परिस्थितीत याच मतदारसंघातून पूनम महाजन या खासदार आहेत. भाजपमध्ये दाखल होताच उज्वल निकम यांची भाषा बदललेली दिसत असून स्वतःला ‘ अजातशत्रू ‘ म्हणत स्वतःवर स्तुतीसुमने उधळत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे देखील कौतुक केले. 

उज्वल निकम पत्रकारांशी बोलताना म्हणाले , ‘ मी स्वतः अजातशत्रू आहे मला कोणीही शत्रू नाही आणि मी ज्या विचाराने भारतीय जनता पक्षात आलेलो आहे तो विचार मोदींजी आणि अमित शाह यांनी दिलेला आहे . भारताचे गृहमंत्री अमित भाई आणि मोदीजी या जोडगोळीने या देशाच्या विकासाची गंगा ज्या चांगल्या रीतीने संपूर्ण पाश्चिमात्य देशात पसरवली त्याचा विचार करता आणि गुन्हेगारांचं कंबरड मोडण्याची ताकद या दोघांच्या शक्तीत मला दिसून आली याचाच परिणाम असा की पुलवामा असो किंवा इतर कुठलाही भ्याड हल्ला असो त्याच्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक करून संपूर्ण जगात एक दाखवून दिलं की टेरर आणि टॉक या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाही . सगळ्या पक्षांनी माझ्या उमेदवारीला जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे ‘, असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा