कर्नाटकच्या रेवण्णा प्रकरणातील महिलेचे अपहरण ,  एक जर्मनीला तर दुसरा फरार.. 

शेअर करा

कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात एका महिलेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाच दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याने अखेर महिलेच्या मुलाने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रज्वल याने दोरीने बांधून या महिलेवर अत्याचार केल्याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला होता. 

प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील हे जेडीएसचे नेते असून त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना सभा घेऊन आवाहन केलेले होते. दोन्ही आरोपींच्या विरोधात पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर आता आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

एचडी रेवण्णा आणि सतीश बाबान्ना अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे असून त्यातील सतीश याला अटक करण्यात आलेली आहे तर एचडी मात्र सध्या गायब आहेत. प्रज्वल रेवण्णा हा यापूर्वीच जर्मनीला फरार झालेला असून अपहरण करण्यात आलेल्या महिलेचा सध्या शोध घेण्यात येत आहे. 


शेअर करा