‘ कुणालाच सांगू नको अन काकडे याचे नाव घेऊ नको ‘ , मुलीच्या आईसोबत तिघांवर गुन्हा दाखल

शेअर करा

पुण्यामध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून वाघोली इथे एका अल्पवयीन मुलीवर दोन व्यक्तींनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईने अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना साथ दिल्याचे समोर आलेले असून आईसोबत तीन जणांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तीनही जणांना अटक करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अविनाश शेळके , गोविंद काकडे आणि मुलीची आई अशी गुन्हा झालेल्या व्यक्तींची नावे असून फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही एका कापडाच्या दुकानात काम करत होती. तिथे तिची शेळके याच्यासोबत ओळख झाली शेळके यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत तीन-चार वेळा शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे काही फोटो व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये ठेवले. 

दुसरा आरोपी असलेला काकडे हा फिर्यादीच्या आईचा मित्र आहे त्याने देखील फिर्यादीची आई घरात नसताना जबरदस्तीने फिर्यादी मुली सोबत शारीरिक संबंध ठेवले आणि फिर्यादीने आईला या प्रकाराची माहिती दिली त्यावेळी आईने ‘ कुणालाच काही सांगू नको काकडे याचे नाव कुठे घ्यायचे नाही ‘ असे म्हणत तिलाच धमक्या देण्यास सुरू केले. सामाजिक संस्थेत काही काळ ही मुलगी राहिली त्यानंतर तिला दिवस गेल्याचे समोर आले आणि प्रकरण अखेर पोलिसात पोहोचले. 


शेअर करा