‘ ना अहिल्यानगरचा खासदार बदलणार अन..‘, सुजय विखेंचा अहंकार तर मोदी खोटं बोलले

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नगरमध्ये सभा घेतली.  पंतप्रधान मोदी यांची सभा दुपारी एक वाजता होती मात्र एक वाजेपर्यंत अपेक्षित गर्दी झाली नव्हती. सभेसाठी मोठ्या प्रमाणात आयात केलेली गर्दी दिसून येत होती. शहरातील कष्टकरी समाजातील अनेक व्यक्तींना पाचशे रुपये प्रति दराने सभेसाठी बोलवण्यात आलेले होते. खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या नावाचा दरारा पाहता सभेसाठी मैदान अपुरे पडेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही . दुपारी एकच्या दरम्यान अक्षरशः व्हीव्हीआयपी पास असलेल्या खुर्च्या देखील 98 टक्के रिकाम्या होत्या त्यानंतर मात्र हळूहळू गर्दी जमण्यास सुरुवात झाली. 

सुजय विखे यांनी यावेळी बोलताना , ‘ आपल्या विश्वासाला सार्थ ठरेल असेच काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी केलं . मला विश्वास आहे की आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होणारी ही महाविजय संकल्प सभा आज याच मैदानावर तिसऱ्यांदा होत आहे . आजपर्यंत जेव्हा प्रधानमंत्री मोदी साहेब या मैदानावर सभा घेतात तेव्हा तिथला उमेदवार शंभर टक्के विजय होतो. पांडुरंगाची कृपा पहा की सभा तिसरी आहे,  मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचे आणि माझा अनुक्रम क्रमांक नंबर देखील तीन आहे 

कुठल्याही प्रकारे विकासाचा मुद्दा समोरून मांडला जात नाही. आपण विकास करण्यासाठी राजकारणात आहोत. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपण पाच वर्षे अहिल्यानगरला केलं. चार मेला जेव्हा मतपेट्या उघडतील तेव्हा दोन गोष्टी होतील ना या देशाचे प्रधानमंत्री बदलणार आणि ना या अहिल्यानगरचा खासदार बदलणार ‘ असेही सुजय विखे पुढे म्हणाले. भाजपला इतकाच विश्वास असेल तर नगरला सभा घेण्याचे तरी काय प्रयोजन होते हे सुजय विखे यांनी सांगणे गरजेचे होते. 

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना , ‘  काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जणू काही जाहीरनामा आहे. ओबीसी एससीआदींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा इरादा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येत आहे. काँग्रेस हे संविधान बदलण्याचे काम करत आहे.’  अशा स्वरूपाची  खोटी वक्तव्य केलेली आहेत.  काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठल्याही पद्धतीने मोदी यांनी केलेले दावे आढळून येत नाहीत. 


शेअर करा