‘ प्रज्वल रेवण्णा जर्मनीला फरार हीच मोदी यांची गॅरंटी ‘ ,  राहुल गांधींनी डागली तोफ

शेअर करा

‘ एनडीए आघाडीचा उमेदवार असलेला प्रज्वल रेवण्णा हा जर्मनीला फरार झाला. सुमारे चारशे पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार त्याने केलेला होता आणि तरीही मोदी यांनी हसनमध्ये त्यांच्यासाठी प्रचार केला हे लज्जास्पद असून भाजप अत्याचार करणाऱ्या प्रज्वलसाठी ढाल करत आहे हीच मोदींची हमी आहे . प्रज्वल रेवण्णा याच्यावर काँग्रेस योग्य ती कायदेशीर कारवाई करेल . सत्तेसाठी काहीही ही भाजपची विचारधारा आहे ‘, असे राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे. 

राहुल गांधी म्हणाले की , ‘ सर्व काही यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असून तरीदेखील प्रज्वल याला देशातून पळून जाण्यास मोदी यांनी मदत केली आहे. महिलांवर अत्याचार करणारे व्यक्तीला जर्मनीला जाऊ दिले हीच मोदी यांची हमी आहे. भ्रष्ट असो किंवा अत्याचारी भाजप त्यांना मदत करत आहे ,’ असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी संविधानासोबत संदर्भात वक्तव्य केलेले होते त्याचा देखील राहुल गांधी यांनी खरमरीत समाचार घेतलेला असून ,’  नड्डा हे माओवादी आहेत त्यांनी संविधानाचाअनादर केलेला आहे. मोदी म्हणतात त्यांना संविधानाचे रक्षण करायचे आहे तर मग संविधानावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीबद्दल मोदी गप्प का आहेत. संविधान बदलले तर दलित ओबीसी जमिनी , संपत्ती गमावतील. भाजपला एससी एसटीचे आरक्षण रद्द करायचे आहे , ‘असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा