केडगावमध्ये व्यावसायिकास कार्यालयात घुसून मारहाण , काय घडलं कारण ? 

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार केडगाव परिसरात समोर आलेला असून जागा खाली करण्यासाठी एका व्यवसायिकाला तीन जणांनी आतमध्ये घुसून मारहाण केलेली आहे. केडगाव उपनगरातील भूषण नगर परिसरात राधेश्याम चौकातील ही घटना आहे

उपलब्ध माहितीनुसार , राजेंद्र मोहनराव पठारे ( वय 43 राहणार भूषण नगर केडगाव ) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून राजू भाऊसाहेब सातपुते , विजू भाऊसाहेब सातपुते आणि एक महिला ( सर्वजण राहणार भूषण नगर केडगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत

सव्वीस तारखेला सकाळी राजू सातपुतेसोबत इतर तीन जण पठारे यांच्या तिरुपती डेव्हलपर्स नावाच्या कार्यालयात आले आणि त्यानंतर त्यांनी ‘ तुम्ही अनेकदा सांगून देखील जागा खाली का करत नाही ?’ असा प्रश्न विचारत फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडून टाकले असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिलेली असून खोट्या केसेस दाखल होण्याची आपल्यावर शक्यता आहे असा आरोप करत त्यांनी कोतवाली पोलिसात याप्रकरणी धाव घेतलेली आहे. 


शेअर करा