देवेंद्र फडणवीस मटन खाणारे ब्राह्मण त्यामुळे.., नाना पटोले यांची टीका 

शेअर करा

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर इथे प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केलेले होते. महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीतला पराभव भाजपला दिसू लागलेला आहे म्हणून मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रातल्या सभा वाढवल्या आहेत असे म्हटलेले आहे. फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी फडणवीस यांचा मटण खाणारे ब्राह्मण असाही उल्लेख केलेला आहे. 

काय म्हणाले नाना पटोले ? 

भाजपने गेल्या दहा वर्षात पाप केलेल आहे. महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली शेतकऱ्यांना उध्वस्त केले . बेरोजगारांचा देश अशी आपली ओळख बनवली. गरिबांचे जीवन उध्वस्त केलं आणि या मुद्द्याकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून काँग्रेसने पन्नास वर्षात काय केलं साठ वर्षात काय केलं असे मोदी म्हणत आहेत. 

2019 मध्ये नरेंद्र मोदी सोलापूरला आले त्यावेळी लष्कराचे गणवेश शिवण्यासाठी सोलापूरमध्ये केंद्र उभे करणार असे म्हणाले होते त्या वचनावर मोदी आता सोलापूरमध्ये येऊन काहीच बोलले नाहीत. नरेंद्र मोदींच्या सभेत चारशे रुपये देऊन कर्नाटकवरून माणसे आणण्यात आलेली होती आणि राहुल गांधी यांच्या सभेला उत्स्फूर्तपणे लोक आलेले होते. मोदी यांचे तेच तेच भाषण ऐकून आता लोक कंटाळलेले आहेत. 

फडणवीस यांच्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की , ब्राह्मणांना शाप देण्याचा अधिकार आहे हे आम्ही पोथी आणि पुराणांमध्ये वाचलेले आहे मात्र देवेंद्र फडणवीस हे मटन खाणारे ब्राह्मण आहेत त्यांचा शाप आम्हाला लागणार नाही ‘ असे ते म्हणाले. पत्रकारांनी त्यांना तुम्ही त्यांना कधी मटन खाताना पाहिलेले आहे का असे विचारले त्यावेळीआम्ही एकत्र मटण खाल्लेला आहे असे ते म्हणाले. 


शेअर करा