लॉजवर अत्याचार करून विवाहितेला माहेरी नगरला सोडलं

शेअर करा

नगर येथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका व्यक्तीने एका महिलेला तुझे आणि तुझ्या पतीचे सुरू असलेले भांडण मिटवतो असे सांगून तिला पुणे परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यासोबत अत्याचार केलेला आहे. सदर घटना ही बुधवारी घडली असून कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार, तानाजी कारभारी सातपुते ( राहणार उक्कडगाव तालुका श्रीगोंदा ) असे आरोपीचे नाव असून सदर महिला ही पतीच्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपासून माहेरी निघून आलेली होती. तानाजी सातपुते हा 21 तारखेला तिच्या घरी आला आणि तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे भांडण मिटवून देतो असे सांगून तिला आपल्यासोबत गाडीत बसवले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला पुण्याला जाण्यास तयार झाली आणि ते घरातून निघाले.

पुण्याला जात असताना एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवली आणि तेथील एका लॉजवर आपण आता फ्रेश होऊ आणि लगेच पुढील प्रवासाला निघू असे देखील तो म्हणाला त्यानंतर ते दोघे लॉजवर गेल्यानंतर फ्रेश झाल्यावर पीडित महिला बाहेर निघण्याच्या तयारीत असताना आरोपीने तिला रूममध्ये ओढले आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर आरोपीने तिला तिच्या पतीकडे घेऊन जाण्याऐवजी पुन्हा नगरमध्ये आणून सोडले. पीडित महिलेने त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिस तपास सुरू आहे.


शेअर करा