शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल गीतातील जय भवानी शब्द काढून टाकण्यासाठी नोटीस बजावलेली होती त्यावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावत ‘ मोदी शहा यांच्याकडून उघड उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू आहे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही मात्र आम्हाला जय भवानी शब्द काढून टाकण्यासाठी नोटीस बजावली जाते कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा शब्द गीतातून काढणार नाही ‘, असे म्हटले आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी जोरदार टीका करताना , ‘ जय भवानी जय शिवाजी ही आमची घोषणा आहे या घोषणेतील जय भवानी शब्द तुम्ही काढायला लावत आहात , उद्या जय शिवाजी शब्द काढायला लावल अशी हुकूमशाही पद्धत आम्ही कुठल्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही .’
आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतच राहणार आहोत . निवडणूक आयोगाने जर आमच्यावर कारवाई करायची ठरवले असेल तर आधी मोदी आणि अमित शहा यांच्यावर कारवाई करावी मग ते महाराष्ट्राच्या देवतेचा अपमान कसा करतात हे पाहू , ‘ असे देखील ते पुढे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करताना मध्य प्रदेश निवडणुकीच्या वेळी मोदींनी बजरंग बलीच्या नावावर मते द्या असे म्हटले होते तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला मत दिले तर रामलल्लाचे मोफत दर्शन देऊ असे देखील सभेत म्हटलेले होते त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? याविषयी देखील संताप व्यक्त केलेला आहे.