सर्वसामान्य चोर जे रस्त्यावर करतो तेच मोदींनी.., राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल 

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळ इथे बोलताना निवडणूक रोखे आणि तपास संस्थांचा गैरवापर यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला आणि मोदींना धारेवर धरलेले असून मोदी हे केवळ देशातील श्रीमंत उद्योगपतींनाच मदत करतात असा आरोप केलेला आहे. 

राहुल गांधी यांनी केरळमधील कोझिकोड आणि वायनाड येथे मतदारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की , ‘ निवडणूक रोखे हा जगातील सर्वात मोठा खंडणी गैरवापर आहे. तपासे यंत्रणांचा गैरवापर करत उद्योगपतींवर दबाव आणून अक्षरशः खंडणी वसूल करण्यात आली. सर्वसामान्य चोर जे रस्त्यावर करतो तेच मोदींनी राष्ट्रीय पातळीवर केले. निवडणूक रोखे हा धमकी देण्याचाच प्रकार होता. तपास अधिकारी उद्योजकांची चौकशी करायची आणि त्यांना खंडणी देण्यास सांगण्यात यायचे , ‘ असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

राहुल गांधी पुढे म्हणाले की , ‘ मोदींना देश चालवता येत नाही. कोरोना काळात त्यांनी लोकांना थाळ्या वाजवायला सांगितले होत्या. देशाच्या खऱ्या प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करणे आणि श्रीमंत उद्योगपतींचे संरक्षण करणे अशाच पद्धतीने मोदींचा कारभार सध्या सुरू आहे, ‘ असे देखील ते पुढे म्हणाले .


शेअर करा