प्रज्वल रेवण्णा याची अखेर हकालपट्टी , 3000 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ झालेत व्हायरल 

शेअर करा

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू असलेला कर्नाटकातील हसनचा खासदार प्रज्वल रेवण्णा याला जेडीएसमधून अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्याचे सुमारे 3000 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेले होते. एनडीएचा भाग असलेली जेडीएस यांच्या अनेक नेत्यांकडून त्याविषयी तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेत प्रज्वल रेवण्णा याच्यासाठी मते मागितली होती. 

जेडीएस कोअर कमिटीचे अध्यक्ष जी टी देवेगौडा यांनी यावेळी बोलताना , ‘ तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्याची आम्ही आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना शिफारस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली नाही तर जेडीएसला जनमानसात पुन्हा आधार मिळणार नाही ‘ असे सांगितले आहे . 

28 एप्रिल रोजी त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झालेला होता. लैंगिक छळ , महिलांना धमकावून देत महिलांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणे असा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील एच डी रेवण्णा या दोघांनीही घरातील काम करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून संबंधित पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. प्रज्वल रेवण्णा आत्ता सध्या फरार झालेला असून तो जर्मनी इथे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्यासाठी मते मागितली होती . 


शेअर करा