‘ ॲड. निकम्मा ‘ म्हणत भक्ताड जमातीवर मराठी अभिनेत्याची टीका 

शेअर करा

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा पत्ता कट करून त्या जागेवर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना भाजपची  उमेदवारी देण्यात आलेली आहे. उज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात टीका केली जात असून मराठी चित्रपट अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये उज्वल निकम यांच्यावर नाव न घेतला निशाणा साधलेला आहे. 

किरण माने यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की , ‘ मी कितीही मानवतावादी असलो तरी भक्ताड जमात वेदनेनं तडफडली की मला क्रूर आनंद होतो ! तेवढा एक टक्का मी जरा राक्षसी वृत्तीचा आहे.केवळ त्यामुळे ॲड. #निकम्मा यांनी जरा जास्तच दणके खाल्ले माझ्याकडून. बाकी तूर्तास दोन दिवस आय रेस्ट माय केस ‘. 

उज्वल देवराव निकम असे उज्वल निकम यांचे पूर्ण नाव असून मुंबई उत्तर मध्य मधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सद्य परिस्थितीत याच मतदारसंघातून पूनम महाजन या खासदार आहेत. भाजपमध्ये दाखल होताच उज्वल निकम यांची भाषा बदललेली दिसत असून स्वतःला ‘ अजातशत्रू ‘ म्हणत स्वतःवर स्तुतीसुमने उधळत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे देखील कौतुक केले आहे . 

उज्वल निकम पत्रकारांशी बोलताना म्हणाले , ‘ मी स्वतः अजातशत्रू आहे मला कोणीही शत्रू नाही आणि मी ज्या विचाराने भारतीय जनता पक्षात आलेलो आहे तो विचार मोदींजी आणि अमित शाह यांनी दिलेला आहे . भारताचे गृहमंत्री अमित भाई आणि मोदीजी या जोडगोळीने या देशाच्या विकासाची गंगा ज्या चांगल्या रीतीने संपूर्ण पाश्चिमात्य देशात पसरवली त्याचा विचार करता आणि गुन्हेगारांचं कंबरड मोडण्याची ताकद या दोघांच्या शक्तीत मला दिसून आली याचाच परिणाम असा की पुलवामा असो किंवा इतर कुठलाही भ्याड हल्ला असो त्याच्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक करून संपूर्ण जगात एक दाखवून दिलं की टेरर आणि टॉक या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाही . सगळ्या पक्षांनी माझ्या उमेदवारीला जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे ‘, असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा