‘ उबाठा ‘ म्हटलं की उलटी आल्यासारखं होतं , कोण म्हटलंय पहा ? 

शेअर करा

भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर टीका करताना उबाठा म्हटल्यानंतर उलटी आल्यासारखे होते असे म्हटलेले आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माध्यमांकडून अनेकदा उबाठा नावाने थोडक्यात उल्लेख केला जातो त्यावर राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सध्या मनसे सक्रिय झालेली असून त्यांच्या प्रचारासाठी मनसेचे कार्यकर्ते रत्नागिरी दाखल झालेले होते. राज ठाकरे सभेला हजर नसले तरी सिंधुदुर्गमध्ये राज ठाकरे भाजपच्या प्रचारासाठी सात तारखेला येतील अशी शक्यता आहे. 

नारायण राणे यांनी राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करत , ‘  मी लोकसभेचा उमेदवार झालो आणि माझ्यासाठी सभा आयोजित करण्यात आली. योगायोग बघा इथं महायुतीची सभा आणि तिकडं उबाठाची सभा. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेच म्हणेल कारण उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं , ‘ असे देखील नारायण राणे पुढे म्हणाले. 


शेअर करा