बाबाचा ‘ इतिहास ‘ आला समोर , श्रीरामपूरमध्ये व्हीआयपी घालायचे लोटांगण 

शेअर करा

अनेक धार्मिक ठिकाणी आलेले बाबा यांचा इतिहास बऱ्याच जणांना ठाऊक नसतो त्यामुळे याचाच फायदा घेत असले व्यक्ती महापुरुष असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करत असतात. असाच एक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात समोर आलेला असून ज्या व्यक्तीच्या दर्शनासाठी रांग लागायची तो खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समोर आले आणि त्यानंतर तो फरार झाला. 

उपलब्ध माहितीनुसार , फरार झालेल्या आरोपीचे मूळ नाव हे महेश अर्जुन माने असे असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथे एका मठात काम पाहत होता. त्याचा भाऊ बाळकृष्ण महाराज हा देखील याच मठात काम करत असून महेश्वरानंद नावाने तो भक्तांमध्ये लोकप्रिय होता. आरोपी महेश याच्यावर वैष्णवी लक्ष्मण लक्ष्मीकांत पोवार हिच्या खुनाचा गुन्हा दाखल झालेला असून आत्तापर्यंत या प्रकरणात मुलीची आई शुभांगी , भाऊ श्रीधर आणि दोन सेवेकरी देखील आरोपी आहेत. महेश हा तिथून फरार झाला आणि त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यात महेश्वरानंद म्हणून प्रसिद्ध झाला . 

मयत मुलीचा विवाह कोल्हापुरातील एका तरुणाशी जुळवण्यात आला होता मात्र मुलीने आणि होणाऱ्या तिच्या वराने काही दिवस लग्न न करता रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला जो कुटुंबियांना मान्य नव्हता. महेश्वरानंद याच्याकडे गेल्यानंतर त्याने तिची समजूत काढली मात्र मुलीने लग्नात नकार कळवल्यानंतर देवठाणे येथील मठात तिला मारहाण करण्यात आली त्यात तिचा मृत्यू झाला. 

मयत मुलीचे संपूर्ण कुटुंबीय महेश्वरानंद याच्या भक्त परिवारातील सदस्य असून तीन एप्रिल 2024 मधील ही घटना आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर महंत फरार झालेला असून दर्शनासाठी मोठी रांग लागत असे. अनेक राजकीय पदाधिकारी देखील तसेच प्रशासनातील मोठ्या पदावर असणारे अधिकारी देखील त्याच्यापुढे लोटांगण घालत होते. छातीवर घटस्थापना केल्याचे अनेक जादूचे प्रयोग त्याने करून दाखवले त्यामुळे सर्वसामान्य भोळी जनता त्याला फसली होती. हैदराबादचे भाजपचे खासदार ठाकूर राजा सिंग हे देखील त्याला भेटण्यासाठी आलेले होते. आरोपीचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती आहे. 


शेअर करा