‘ शेअर ट्रेडिंगचा आपल्याला अनुभव ‘ , राहात्यातील तरुणाला भुलवलं अन..

शेअर करा

शेअर बाजारात ट्रेडिंगचा आपल्याला अनुभव आहे असे सांगत लंडन इथे राहणाऱ्या एका व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनने राहता तालुक्यातील वाकडी येथील एका तरुणाची पाच लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे. श्रीरामपूर तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , निखिल अशोक लहारे ( वय 37 वर्ष ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून ते मुंबई येथे नोकरी करतात. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो असे आमिष दाखवत त्यांना आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढलेले होते. पोलिसांनी त्यानंतर शरीर सिंग आणि लीना विपरीत नावाच्या दोन जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे अर्थात ही नावे देखील खोटी असण्याचा संशय आहे. 

फिर्यादी यांना मोबाईलवर एक लिंक आलेली होती त्यावर क्लिक केल्यानंतर ते एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि व्हाट्सअप ग्रुपमध्ये गेल्यानंतर तिथे इतर व्यक्तींसोबत देखील त्यांची ओळख झाली त्यावेळी शेअर मार्केटचे आपण जाणकार व्यक्ती आहोत असे सांगत आरोपींनी त्यांना फसवले. 


शेअर करा